Type Here to Get Search Results !

५०००mAh बॅटरीसह लाँच झाला Realmeचा ‘हा’ स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : चीनची कंपनी रियलमीने मार्केटमध्ये आपला नवीन C सीरिजमधील हँडसेट लाँच केला आहे. ला यूनिसॉक टी६१० चिपसेट सोबत सादर करण्यात आले आहे. सोबतच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीपर्यंतचे स्टोरेज यात मिळते. अन्य बाजारात फोन कधी लाँच होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. वाचा : Realme C21Y ची किंमत आणि उपलब्धता: या फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,४९०,००० व्हिएतनामी डाँग (जवळपास ११,३०० रुपये) आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,९९०,००० व्हिएतनामी डाँग (जवळपास १३,०० रुपये) आहे. हा फोन निळ्या आणि काळ्या रंगात येतो. मात्र, फोन कंपनीच्या व्हिएतनाम वेबसाइटवर लिस्ट करण्यात आलेला नाही व सोशल मीडियावर देखील घोषणा केलेली नाही. वाचा : Realme C21Y चे फीचर्स: हा फोन अँड्राइड १० वर काम करतो. यामध्ये ६.५ इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १६००x७२० आहे. याच्या फ्रंटमध्ये नॉच कटआउट आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा मिळतो. फोन यूनिसॉक टी६१० चिपसेटसोबत येतो. यात माली जी५२ जीपीयू देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी सेंसर १३ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सल मॅक्रो आणि तिसरा २ मेगापिक्सल मोनोक्रोम लेंस आहे. फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. C21Y मध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४G, Wi-Fi ८०२.१ b/g/n, ब्लूटूथ ५.०, जीपीएस आणि ग्लोनास सारखे फीचर्स मिळतील. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w7istv
https://ift.tt/367qzMf
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.