नवी दिल्ली. हे नामांकित आणि लोकप्रिय App आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. Instagram प्रोफाइलमधील युजरनेम हे अतिशय महत्वाचे असते. सहसा ते प्रत्येकाच्या प्रोफाइलवर @ चिन्हा नंतर लिहिलेले असते. याच युजरनेमच्या मदतीने काही युजर्स आपल्याला पोस्टमध्ये टॅग करतात. युजर्सनेम आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलच्या URL चा देखील एक भाग आहे. वाचा: खरं तर Instagram किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या पसंतीचे युजरनेम शोधणे खूप कठीण काम आहे. जरी आपणास आपल्या आवडीचे युजरनेम सापडलेच तरी आपण ते काही वर्षांनी बदलू शकता. Instagram देखील आपल्याला आपले डिस्प्ले नाव तसेच आपले युजरनेम अॅप किंवा वेब इंटरफेसद्वारे बदलण्याचा पर्याय देते. आपण ज्यावेळी ते पुनर्स्थित करता तेव्हा आपले जुने मेंशन काम करणे थांबवते. म्हणून आवश्यक असतानाच ते बदलावे. काही सोप्प्या टिप्स वापरून काही मिनिटांत युजरनेम बदलता येते. पाहा टिप्स. फॉलो करा या स्टेप्स
- सर्वप्रथम इन्स्टाग्राम अॅप उघडावे लागेल.
- तळाशी असलेल्या प्रोफाइल चिन्हावर टॅप करा. आपण आता आपल्या प्रोफाइल पेजवर आहात.
- येथे असलेल्या एडिट बटणावर क्लिक करा आता युजरनेम विभागावर टॅप करा आणि नवीन युजरनेम प्रविष्ट करा यानंतर ओके किंवा डिक बटण दाबा.
- युजरनेम युनिक असणे आवश्यक आहे, म्हणजे असे नाव जे प्लॅटफॉर्मवरील कोणताही अन्य युजर वापरत नाही.
- यात अक्षरे तसेच संख्या, पूर्णविराम आणि अंडरस्कोर वापरू शकता.
- आक्षेपार्ह शब्द असलेली युजरनेम वापरण्यास इन्स्टाग्राम आपल्याला परवानगी देत नाही.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3es409J
https://ift.tt/3Bdt269

