Type Here to Get Search Results !

८ हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल 'हा' स्मार्टफोन, अँड्रॉइड गो आणि ३२ GB इनबिल्ट स्टोरेज सारखे फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. स्मार्टफोन रशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. हा एक एन्ट्री लेव्हल हँडसेट असून युनोसोक प्रोसेसर आणि अँड्रॉइड ११ गो सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. सिंगल रियर कॅमेरा देखील ब्लेड ए ३१ मध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या झेडटीई ब्लेड ए ३१ ची किंमत, वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर. वाचा: ZTE Blade A31 : किंमत आणि उपलब्धता ब्लेड ए ३१ ची किंमत ७, ४९० आरयूबी (सुमारे ७,५०० रुपये) आहे. हा फोन निळ्या आणि राखाडी रंगात उपलब्ध आहे. कंपनी हे हँडसेट इतर बाजारामध्ये कधी उपलब्ध करून देणार याबद्दल अद्याप माहिती नाही. ZTE Blade A31 : फीचर्स ZTE Blade A31 मध्ये ५.४५ इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे ज्याचे रेझोल्यूशन ७२० x १४४० पिक्सल आहे. स्क्रीनचे आस्पेक्ट रेशो १८:९ आहे. ब्लेड ए ३१ वर शीर्षस्थानी आणि तळाशी जाड बेझल आहेत. सोबतच, फोनमध्ये युनिकोक एससी ९८६३ ए प्रोसेसर आणि २ जीबी रॅम सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. स्मार्टफोनला ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहेजे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. ZTE Blade A31 च्या मागील बाजूला एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा मागील कॅमेरा आहे. सेल्फीसाठी हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनचा मागील भाग पॉली कार्बोनेटचा बनलेला आहे. मागील कॅमेरा एचडीआर आणि पॅनोरामा सारख्या मोडचे समर्थन करतो. ZTE Blade A31 Android ११ गो आवृत्तीसह येते. यात कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी एनएफसी समर्थन आहे. फोनला पावरफुल बनविण्यासाठी ३,००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ २, जीपीएस, मायक्रो यूएसबी आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक देण्यात आले आहेत. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. डिव्हाइसचे डायमेन्शन १४० x ७१ x ८.९ मिमी आहे आणि वजन १६६ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36wg59l
https://ift.tt/3ySPPSE
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.