Type Here to Get Search Results !

BSNL च्या या प्लानमध्ये २ महिन्यांच्या वैधतेसह मिळेल १०० जीबी डेटा, पाहा किंमत

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड () इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अनेक स्वस्त प्लान्स ऑफर करत आहे. मात्र, अनेक भागात कंपनीची सर्व्हिस चांगली नसल्याने ग्राहक , आणि व्हीआय सारख्या कंपन्यांना प्राधान्य देत आहे. बीएसएनएलने अद्याप पूर्ण भारतात ४जी सेवा देखील सुरू केलेली नाही. मात्र कंपनीची ३जी सर्व्हिस चांगली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी चांगले प्लान्स सादर केले आहेत. आता बीएसएनएलने नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. यामध्ये १०० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानविषयी जाणून घेऊया. वाचाः BSNL चा १०० जीबीचा प्लान बीएसएनएलच्या या प्लानची किंमत ४४७ रुपये आहे. यामध्ये ६० दिवस वैधतेसह १०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये डेटा वापरण्यावर कोणतीही मर्यादा नाही. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच, EROS NOW चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. जिओचा ४४७ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता देखील ६० दिवस आहे. मात्र, यात ५० जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वाचाः वोडाफोन आयडियाचा ४४७ रुपयांचा प्लान वोडाफोन-आयडियाच्या या प्लानची वैधता देखील ६० दिवस असून, यात ५० जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि VI अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वरील सर्व प्लान्समध्ये बीएसएनएलच्या प्लानमध्ये दुप्पट डेटा मिळतो. मात्र, अन्य सुविधा तिन्ही प्लानमध्ये समान आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xinXah
https://ift.tt/3hnOVYI
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.