Type Here to Get Search Results !

जिओचे सर्वात स्वस्त प्लान्स, फक्त १.५ रुपयात कॉलिंग-डेटा मोफत

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ग्राहकांना एकापेक्षा एक दमदार प्लान्स आहेत. जिओकडे २ असे आहेत, ज्यात यूजर्सला दिवसाला दीड रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. हे प्लान ३९ रुपये आणि ७५ रुपयांचे आहेत. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाचा देखील फायदा मिळतो. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: ७५ रुपयांचा प्लान ७५ रुपयांच्या प्लानसोबत Buy 1 Get 1 Free ऑफर मिळत आहे. एका प्लानसोबत एक मोफत मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. मात्र एक प्लान मोफत मिळाल्यावर ही वैधता ५६ दिवस होते. प्लानमध्ये एक दिवसाचा खर्च १.३३ रुपये येतो. यात अनलिमिटेड कॉलिंग, एकूण ६ जीबी डेटा आणि ५० एमएमएस मिळतात. सोबतच, अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. वाचा: ३९ रुपयांचा प्लान ३९ रुपयांचा प्लान देखील Buy 1 Get 1 Free ऑफरसह येतो. या प्लानची वैधता १४ दिवस आहे. मात्र, एक प्लान फ्री मिळाल्याने वैधता वाढून २८ दिवस होते. या प्लानमध्ये दिवसाला फक्त १.३९ रुपये खर्च येतो. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, एकूण २.८ जीबी डेटा आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kNHufq
https://ift.tt/3ePlH3b
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.