Type Here to Get Search Results !

बापरे! स्मार्टवॉचची बॅटरी फुटली, ४ वर्षीय मुलीच्या हाताला गंभीर दुखापत

नवी दिल्लीः आतापर्यंत आपण फक्त स्मार्टफोनची बॅटरी फुटल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. परंतु, आता स्मार्टवॉचची बॅटरी फुटून एक ४ वर्षाची मुलगी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बॅटरी फुटल्याची ही घटना चीनमध्ये घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, एका स्मार्टवॉचमध्ये हा स्फोट झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एका चार वर्षाच्या मुलीचे मनगट भाजले आहे. या मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. वाचाः कशी घडली घटना ही घटना चीनच्या क्वॉनझोऊ शहरात घडली आहे. एक मुलगी यियी हुआंग सोबत या आठवड्यात घडली. याहू न्यूज ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार, ही घटना या महिन्याच्या सुरुवातीला घडली आहे. यियी आपल्या चुलत भावासोबत खेळत होती. त्याचवेळी आजीने हा आवाज ऐकला. त्यानंतर ती ओरडल्याचे ऐकले. ज्यावेळी आजी त्या ठिकाणी पोहोचली त्यावेळी हवेत खूप सारा धूर दिसत होता. तसेच काही तरी जळाल्याचा वास येत होता. त्यानंतर मुलीच्या हातातून धूर येत होता. तसेच ती जोरजोरात रडत होती. हे सर्व स्मार्टवॉचची बॅटरी फुटल्याने झाले होते. वाचाः हे त्यावेळी घडले ज्यावेळी यियीने आपल्या मनगटावर स्मार्टवॉचला हटवले. त्यानंतर तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. स्फोटाच्या कारणामुळे हाताच्या मागील बाजुस थर्ड डिग्री बर्न झाले होते. यियीला स्क्रीन ग्राफ्टची प्रक्रिया करावी लागली. या घटनेची सर्व माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आली नाही. ज्यात स्मार्टवॉचच्या निर्मात्याचा नावाचा समावेश आहे. मुलीचे वडील हुआंग या घटनेने दुखी झाले असून ते नुकसान भरपाई मिळवण्यासाठी निर्मात्यासोबत बोलणी करीत आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hj92qG
https://ift.tt/3hMibar
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.