Type Here to Get Search Results !

टीव्हीपासून एसीपर्यंत... अ‍ॅमेझॉन सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह मिळतील ‘या’ वस्तू

नवी दिल्ली : आपल्या वार्षिक प्राइम डे सेल २०२१ साठी तयार आहे. हा सेल २६ जुलैला सुरू होणार असून, २७ तारखेपर्यंत रात्रीपर्यंत चालेल. सेलमध्ये अ‍ॅमेझॉन टीव्ही आणि होम अप्लायंसच्या खरेदीवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. कंपनी काही ठराविक डिव्हाइसवर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करेदी करण्याचा विचार करत असाल तर ४के टीव्ही, , एसी, रेफ्रिजरेटरपासून ते डिशवॉशरपर्यंतच्या टॉप ऑफर्स पाहू शकता. वाचा: या सेलमध्ये अ‍ॅमेझॉन एसीवर बंपर सूट देत आहे. १-टन एसीची किंमत १६,९९९ रुपये, १.५ टन एसीची किंमत २५,९९० रुपये आहे, तर २-टन एसीवर ३० टक्के सूट मिळेल. कंपनी रेफ्रिजरेटर्सवर देखील सूट देत आहे. सेलमध्ये कन्वह्रेटबल रेफ्रिजरेटरची सुरुवाती किंमत १३,६९० रुपये, एनर्जी-एफिशिएंट १३,६९० रुपये आणि हाय-कॅपिसिटी रेफ्रिजरेटर १२,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत मिळतील. वाचा: सेलमध्ये ३९,९९० रुपये किंमतीचे फॅबर १२ प्लेस सेटिंग्स डिशवॉशर कमी किंमतीत उपलब्ध होईल. ६४,९९० रुपये किंमतीचे एलजीचे १४ प्लेस सेटिंग्स वाय-फाय डिशवॉशर देखील डिस्काउंटसह उपलब्ध असेल. कंपनी Bosch आणि Voltas च्या खरेदीवर देखील सूट देत आहे. अ‍ॅमेझॉन इंडियानुसार, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड व ईएमआय ट्रांझॅक्शनच्या माध्यमातून खरेदीवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय, १८-२४ वय असलेले ग्राहक देखील पाइम मेंबरशिपवर यूथ ऑफरचा लाभ घेऊ शकतात. Choices of Plan च्या माध्यमातून ५० टक्के सूट प्राप्त करू शकतात. मेंबर्स आपल्या Pay ICICI बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के रिवॉर्ड पाँइंट देखील मिळवू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ztUt9X
https://ift.tt/3BvdhaV
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.