Type Here to Get Search Results !

तुमच्या आवाजाने काम करेल स्मार्टफोन, सेटिंग्समध्ये असा करा बदल, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : अनेकदा तुम्हाला वापरताना टच करण्याचा कंटाळा आला असेल व आवाजाने फोन कंट्रोल व्हावा असे वाटले असेलच. जर तुम्हाला तुमचा अँड्राइड स्मार्टफोन आवाजाने कंट्रोल करायचा असेल तर चे Voice Access अ‍ॅप ही सुविधा उपलब्ध करून देते. यूजर्स आवाजाद्वारे अ‍ॅप्स उघडणे, नेव्हिगेट करणे आणि टेक्स्ट करणे अशी कामे हाताचा उपयोग न करता करू शकतात. वाचा : अँड्राइड स्मार्टफोनवर कसा कराल याचा वापर ? १. सेटिंग्स चेक करा
  • यासाठी तुमच्या डिव्हाइसचे अँड्राइड व्हर्जन ५.० किंवा त्यापेक्षा पुढचे हवे.
  • अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा.
  • कोणत्याही स्क्रीनवरून Ok Google डिटेक्शन सुरू करा.
  • ऑफलाइन स्पीच रिकॉग्निशनसाठी तुम्ही कोणती भाषा डाउनलोड केली आहे ते पाहा.
  • Voice Access डाउनलोड करा. प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
२. Voice Access चा उपयोग करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
  • सर्वात आधी तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जा.
  • Accessiblity सेटिंग्स उघडा आणि वॉयस अ‍ॅक्सेसवर टॅप करा.
  • त्यानंतर Use service वर क्लिक करा. याप्रकारे तुम्ही वॉयस अ‍ॅक्सेस सुरू करू शकता.
  • जर Hey Google डिटेंशन सुरू असेल, तर Hey Google, Voice Access बोलून कमांड द्या.
  • यूअर नॉटिफिकेशन उघडा आणि स्टार्ट करण्यासाठी टॅप करा.
  • तुमच्या होम स्क्रीनवर वॉयस अ‍ॅक्सेस अ‍ॅपवर टॅप करा.
  • वॉयस अ‍ॅक्सेस बटनवर टॅप करून तुम्ही फोनला आदेश देऊ शकता. जसे की, तुम्ही Open contacts असे आदेश दिल्यास फोनमधील कॉन्टॅक्ट्स उघडतील.
वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AYPbVM
https://ift.tt/3xyqopp
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.