Type Here to Get Search Results !

आता पैसे न देता ५ वेळा त्वरित मिळेल डेटा, जिओने सुरू केली खास सेवा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी इमर्जेंसी डेटा लोनची सुविधा लाँच केले आहेत. आता यूजर्स डेटा समाप्त झाल्यानंतर लोनवर इंस्टंट डेटा घेऊ शकतील व पैसे नंतर देता येईल. या सर्व्हिसविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: इमर्जेंसी डेटा लोनद्वारे आधी रिचार्ज करणे व नंतर पैसे देण्याची सुविधा मिळेल. याचा फायदा अशा ग्राहकांना मिळेल, ज्यांचा डेली डेटा समाप्त झाला आहे व ते त्वरित रिचार्ज करू शकत नाही. या नवीन सुविधेद्वारे जिओचे प्रीपेड यूजर्स तब्बल ५ वेळा इमर्जेंसी डेटा लोन घेऊ शकते. ग्राहकांना प्रत्येक वेळी ११ रुपयांचा लोन पॅक मिळेल. यात १ डेटा दिला जाईल. इमर्जेंसी डेटा लोन कसे घ्याल ?
  • यासाठी सर्वात आधी माय जिओ अ‍ॅप उघडा आणि डाव्या बाजूच्या मेन्यूवर क्लिक करा.
  • यानंतर मोबाइल सर्व्हिसच्या आत इमर्जेंसी डेटा लोन पर्याय निवडा.
  • येथे इमर्जेंसी डेटा लोन बॅनवर 'Proceed' वर क्लिक करा.
  • येथे 'गेट इमर्जेंसी डेटा' पर्याय निवडा.
  • आता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅक्टिव्हेट नाउ वर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला इमर्जेंसी डेटा लोन सुविधेचा लाभ मिळेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिओने आपला ३,४९९ रुपयांचा सर्वात महागडा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवस वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qJsHTL
https://ift.tt/2V42kfH
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.