Type Here to Get Search Results !

मस्तच! फ्लिपकार्ट सेलचा धमाका, ८ जीबी रॅमसह येणाऱ्या ‘या’ फोनवर तब्बल ७ हजारांची सूट

नवी दिल्ली : २४ जुलैपासून Big Saving Days सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि होम अप्लायंसेजसह वेगवेगळ्या कॅटेगरीमधील प्रोडक्ट्सवर बंपर सूट मिळेल. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कंपनीने घोषणा केला आहे की, स्मार्टफोनला तब्बल ७ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करता येईल. वाचा: ASUS ROG Phone 3: किमत आणि ऑफर्स फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर ७ हजार रुपये, तर १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर ६ हजार रुपये सूट मिळेल. या व्यतिरिक्त आयसीआयसीआय बँक कार्ड आणि ईएमआय ट्रांझॅक्शनवर खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंटस मिळेल. डिस्काउंटनंतर दोन्ही व्हेरिएंट्सला क्रमशः ३९,९९९ रुपये आणि ४३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ASUS ROG Phone 3: स्पेसिफिकेशन्स आसुस रोग फोन ३ मध्ये ३.१ गीगीहर्ट्ज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ग्राफिक्ससाठी क्वालकॉम अड्रेनो ६५० जीपीयू मिळतो. हा फोन अँड्राइड १० वर आधारित ROG UI वर काम करतो. वाचा: या फोनमध्ये ६.५९ इंच डिस्प्ले देण्यात आला असून, याची स्क्रीन पिक्सल डेनसिटी ३९१ पीपीआय आहे. टच सँपलिंग रेट २७० हर्ट्ज ३है. यामध्ये ८/१२ जीबी रॅम आणि १२८/२५६ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. हँडसेटमध्ये एक्सीलेरोमीटर, ई-कंपास, प्रॉक्सिमिटी, हॉल सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, जायरोस्कोप आणि अल्ट्रासोनिक सेंसर मिळेल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ६४ मेगापिक्सल सोनी IMX६८६ सेंसर, १३ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि ५ मेगापिक्सल सेंसरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर मिळेल. यात वाय-फाय, ब्लूटूथ ५.१, ग्लोनास, गॅलिलियो सारखे फीचर्स मिळतील. पॉवरसाठी यात ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटचे वजन २४० ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BEg41l
https://ift.tt/3eQMI62
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.