Type Here to Get Search Results !

लोकांना मिळत आहे बनावट लसीकरण प्रमाणपत्र, असे तपासा तुमचे सर्टिफिकेट खरे की खोटे ?

नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यापासून देशात कोरोना मोहिम सुरू आहे. अनेकजणांनी अथवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करून लस घेतली आहे. आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन देखील लस घेता येत आहे. लस घेतल्यानंतर त्या संदर्भातील प्रमाणपत्र देखील सरकारकडून दिले जात आहे. वाचा: मात्र, तुमचे लसीकरणाचे प्रमाणपत्र खोटे असेल तर ? अनेकांनी बनावट लसीकरण प्रमाणपत्र मिळत असल्याची तक्रार केली आहे. खरे लसीकरण प्रमाणपत्र कसे ओळखायचे ते जाणून घेऊया. अनेकांनी बनावट लसीकरण प्रमाणपत्राची तक्रार केल्यानंतर सरकारने प्रमाणपत्र तपासण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली. तुम्ही घरबसल्या सर्टिफिकेट तपासू शकता.
  • यासाठी तुमच्या फोनवरून verify.cowin.gov.in/ या साइटवर जा.
  • या नंतर तुम्हाला Verify a vaccination certificate चा पर्याय दिसेल. याच्या खाली तुम्हाला स्कॅन क्यूआर कोडचा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कॅमेऱ्या उघडण्यासाठी ब्राउजरला परवानगी द्या.
  • आता प्रमाणपत्रावर दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करा.
  • क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर 'Certificate Successfully Verified' दिसल्यास तुमचे प्रमाणपत्र खरे आहे.
  • जर 'Certificate Invalid' असा मेसेज दिसल्यास प्रमाणपत्र बनावट आहे.
सरकारने लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅपवर ब्लू टिक देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना ही टिक मिळेल. यामुळे आरोग्य सेतू अ‍ॅपवरून लस घेतलेल्यांची ओळख प्रमाणपत्र न पाहताच होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AmJ8tH
https://ift.tt/3woR2zL
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.