Type Here to Get Search Results !

बना शेअर मार्केटचा बादशाह, गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम अ‍ॅप्स

नवी दिल्ली : लोकांचे उत्पादन वाढले की गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात होते. काहीजण सोने खरेदी करत करतात, तर काहीजण बँकेत एफडी करतात. मात्र, बँकांनी व्याजदर कमी केलेल्याने लोकांनी बँकांकडे काहीशी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. अशात लोकं गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. वाचाः सध्या खरेदीची प्रमाण देखील वाढले आहे. याशिवाय आता थेट मोबाइलच्या एका क्लिकवर गुंतवणुकीसाठी पर्याय खुले झाले आहे. अनेक अ‍ॅप्स सध्या उपलब्ध असून, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सहज म्युचअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात देखील , , , असे शब्द प्रचलित झाले आहेत. सध्या झोमॅटोच्या आयपीओची सर्वत्र चर्चा आहे. अशात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी कोणते अ‍ॅप्स चांगले आहेत, ते पाहुयात. Zerodha शेअर मार्केट, डायरेक्ट म्यूचअल फंड्स, बाँड्स आणि सरकारी सिक्योरिटीस सह वेगवेगळे गुंतवणुकीसाठी Zerodha हे अ‍ॅप उत्तम आहे. या कंपनीची स्थापना २०१० साली नितीन कामत आणि निखील कामत यांनी केली होती. येथे तुम्ही तुमचे खाते देखील उघडू शकता. तसेच, येथे खूप कमी ब्रोकरेज घेतले जाते. 5paisa जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आता सुरुवातच करत असाल तर 5paisa हे अ‍ॅप चांगले आहे. येथून तुम्ही डीमॅट अकाउंट देखील उघडू शकता. येथून तुम्ही थेट mutual funds मध्ये गुंतवणूक करू शकता, डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. तसेच अ‍ॅपमधून कर्ज घेण्याची सुविधा देखील तुम्हाला मिळेल. गुंतवणुकदारांकडून 5paisa खूप कमी शुल्क घेते. 5paisa ला बेस्ट ट्रेडिंग अ‍ॅप, २०१९ चा पुरस्कार देखील मिळाला आहे. वाचाः UpStox शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी UpStox हे देखील चांगले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवरून आतापर्यंत ४० लाखांपेक्षा अधिक जणांनी गुंतवणूक केली आहे. या अ‍ॅपवरून तुम्ही स्टॉक्स, म्यूचअल फंड, डिजिटल गोल्ड, आयपीओसह वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. अकाउंट ओपनिंगसाठी येथे शुल्क घेतले जाते. Groww Groww हे ऑनलाइन इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म असून, याच्यामार्फत तुम्ही म्यूचअल फंड आणि स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. याची सुरुवात २०१६ साली झाली असून, याचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे. तुम्हाला येथे स्टॉक्स अकाउंट उघडण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. या अ‍ॅपद्वारे तुम्ही अमेरिकेतील स्टॉक्समध्ये देखील गुंतवणूक करू शकता. इतरही अनेक अ‍ॅप्स वरील अ‍ॅप्स व्यतिरिक्त भारतात Angel Broking App, Sharekhan, Kotak Stock Trader, IIFL Markets, ICICI Direct सह अनेक अ‍ॅप्स थेट मोबाइलद्वारे गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय ठरत आहे. मात्र, कोणत्याही अ‍ॅप्सद्वारे गुंतवणूक करण्याआधी त्याची विश्वासार्ह्यता आणि इतर संपूर्ण माहिती घेणे देखील गरजेचे आहे. जेणेकरून, तुम्ही नुकसान टाळू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3klBU3K
https://ift.tt/3xIQA0n
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.