Type Here to Get Search Results !

ब्लड ऑक्सिजन सेंसर आणि मेंस्ट्रुअल रिमाइंडर्ससोबत नवी स्मार्टवॉच लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः Fire-Boltt Agni स्मार्टवॉचला भारतात लाँच करण्यात आले आहे. यात ब्लड ऑक्सिजन सेन्सर आणि मेंस्ट्रुअल रिमाइंडर्स सारखे खास फीचर्स दिले आहेत. याचा डायल मेटलचा आहे. या वॉच मध्ये 24x7 हार्ट रेट मॉनिटरिंगचे फीचर दिले आहे. Fire-Boltt Agni स्मार्टवॉचची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. याला ब्लॅक औपर पिंक स्ट्रॅप ऑप्शमध्ये आणले गेले आहे. या स्मार्टवॉचची विक्री एक्सक्लूसिव्ह म्हणून रिलायन्स डिजिटल रिटेल स्टोर्स आणि रिलायन्स डिजिटल ऑनलाइन स्टोरवरून केली जाणार आहे. युजर्संना या वॉच मध्ये एक वर्षाची वॉरंटी मिळेल. सोबत ईएमआय ऑप्शन मिळेल. वाचाः स्मार्टवॉचचे फीचर्स या वॉच मध्ये १.४ इंचाचा एचडी टचस्क्रीन कलर डिस्प्ले दिला आहे. याचा पीक ब्राइटनेस ४०० निट्स आहे. ही २.५ डी कर्व्ड ग्लास सोबत येते. या वॉच मध्ये अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही सोबत कॅम्पटिबल आहे. अँड्रॉयड ४.४ किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जन किंवा iOS 9 आणि त्यापेक्षा वरच्या व्हर्जन सोबत सपोर्ट करणार आहे. या स्मार्ट वॉच मध्ये अनेक असे फीचर्स दिले आहेत. ज्यात डिस्टेंस ट्रॅव्हल्स, स्टॅप ट्रॅकर, स्लीम मॉनिटरिंग, कॅलरी बर्न, रिमोट म्यूझिक कंट्रोल आदी फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉचची बॅटरी ८ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते. तर स्टँडबाय वर ३० दिवसांसाठी बॅटरी लाइफ ऑफर करते. वाचाः Fire Boltt Agni फुल चार्ज होण्यास २ तासांचा वेळ लागतो. वॉटर रेसिस्टेंटसाठी या वॉचला IPX7 रेटिंग मिळाली आहे. २०० हून जास्त क्लाउड बेस्ड वॉच फेस ऑफर करते. ग्राहकांना 24x7 हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग सपोर्ट मिळतो. Smartwatch ची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. याला दोन रंगात स्ट्रॅप ब्लॅक आणि पिंक मध्ये खरेदी करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ziU2iS
https://ift.tt/36YNhGR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.