Type Here to Get Search Results !

भारतातील 'या' ग्राहकांना Apple देतंय फ्री AirPods ,पाहा ही जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली. करोनामुळे बऱ्याच विद्यार्थंना शाळा महाविद्यालयांमध्ये जाणे पूर्वीप्रमाणे सोप्पे नाही. अशात आता बऱ्याच काळानंतर अनेक शाळा, महाविद्यालये लवकरच सुरु होणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ने ‘खास’ बॅक टु स्कुल ऑफर आणली आहे. ही ऑफर केवळ Apple ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असून वार्षिक शैक्षणिक ऑफर आता भारतात लाईव्ह आहे. ऑफर सोपी आहे, आपल्या कॉलेज किंवा विद्यापीठाच्या आवश्यकतेसाठी पात्र Mac किंवा iPad खरेदी करा आणि त्यावर AirPods फ्री मिळवा. वाचा: कुणाला घेता येईल ऑफरचा लाभ ? ही ऑफर सध्याच्या आणि नव्याने मान्यताप्राप्त कॉलेज / युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी खरेदी करणारे पालक आणि सर्व स्तरांवरील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. या प्रोडक्ट्सवर मिळतेय ऑफर MacBook Air, MacBook Pro, iMac, Mac Pro and Mac mini. AirPods ची एक फ्री जोडी मिळविण्यासाठी विद्यार्थी सर्व नवीन आयपॅड प्रो आणि आयपॅड एअर देखील खरेदी करू शकतात. 'बॅक टू स्कूल' ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे आणि प्रोडक्ट्सची उपलब्धता साठा, उपलब्धतेच्या अधीन आहे. विद्यार्थ्यांना कोणते AirPods फ्री मिळतील? विद्यार्थ्यांनी Apple प्रोडक्ट्स खरेदी केल्यास त्यांना स्टॅंडर्ड AirPods (वायरलेस चार्जिंगशिवाय) विनामूल्य मिळतील. अतिरिक्त ४,००० रुपयात त्यांना AirPods चे वायरलेस चार्जिंग व्हेरिएंट मिळू शकेल. ज्यांना AirPods Pro पाहिजे आहेत त्यांना अतिरिक्त १०,००० रुपये द्यावे लागतील. Apple एज्युकेशन स्टोअरवर ऑफर घेण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी विद्यार्थी किंवा कर्मचार्‍यांसाठी ऑनलाइन व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे. ही एकमात्र ऑफर नाही जी पात्र ग्राहक घेऊ शकतात. इतर ऑफरमध्ये Apple Care वर २०% सूट, Apple Pencil आणि कीबोर्डवरील शैक्षणिक सवलत (आयपॅड प्रो आणि आयपॅड एअरसाठी) समाविष्ट आहे. Apple, Apple Arcade subscription तीन महिन्यांसाठी विनामूल्य देते. ऑफर विद्यार्थी आणि इतर पात्र ग्राहकांसाठी जवळ-जवळ वर्षभर उपलब्ध असतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kCTX5F
https://ift.tt/3xLTC43
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.