Type Here to Get Search Results !

अधिक रॅमसह Vivo Y51A चे नवीन व्हेरिएंट भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : चे नवीन ६ जीबी रॅम व्हेरिएंट भारतात लाँच झाले आहे. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोनची किंमत १६,९९० रुपये आहे. यात १२८ जीबी स्टोरेज मिळते. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. Y51A फोन Titanium Sapphire आणि Crystal Symphony रंगात येतो. फोनला ई-स्टोरवरून खरेदी करू शकता. वाचाः Vivo Y51A चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स Vivo Y51A मध्ये ६.५८ इंच Halo FullView डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फुल एचडी+ (२४०८x१०८०) रिझॉल्यूशन मिळेल. फोनमध्ये एका बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट मिळेल. यात फेस वेकअपसह अनेक अनलॉक डिव्हाइस फीचर्स आहेत. फोनचे डायमेंशन्स १६३.८६×७५.३२×८.३८mm व वजन १८८ ग्रॅम आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रगॅन ६-सीरिज प्रोसेसरसोबत येतो. हा फोन अँड्राइढ ११ वर आधारित Funtouch OS ११ वर काम करतो. वाचाः Vivo Y51A चा कॅमेरा Vivo Y51A स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या व्यतिरिक्त ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळेल. सेल्फीसाठी एफ/२.० अपर्चरसोबत १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोन वाइड आणि इमर्सिव्ह व्ह्यू सपोर्टसह येतो. स्मार्टफोनमध्ये सुपर नाइट सेल्फी मोड देण्यात आला आहे, जो ऑरो स्क्रीन लाइट आणि एक नॉइज कँसिलेशन फीचरसोबत येतो. यामुळे अंधारात चांगले फोटो काढता येईल. फोनमध्ये अल्ट्रा स्टेब व्हिडीओ सपोर्ट मिळेल, ज्यामुळे मूव्हिंग ऑब्जेक्टचे देखील चांगले फोटो निघतील.. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T66wuU
https://ift.tt/3A65eRe
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.