Type Here to Get Search Results !

'या' तारखेला भारतात लाँच होणार Samsungचे २ शानदार टॅबलेट, पाहा फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली : स्मार्टफोन ब्रँड ने आपले दोन शानदार Galaxy Tab S7 FE आणि च्या भारतीय लाँचिंगची घोषणा केली आहे. या दोन्ही टॅबलेटला १८ जूनला भारतीय बाजारात सादर केले जाईल व २३ जूनपासून विक्री सुरू होईल. प्रमुख फीचर्सबद्दल सांगायचे तर यूजर्सला गॅलेक्सी टॅब एस७ एफईमध्ये मोठी स्क्रीन आणि Snapdragon ७५०G प्रोसेसर मिळेल. तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए७ लाइटमध्ये ड्यूल स्पीकर आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट मिळेल. वाचाः चे स्पेसिफिकेशन्स Samsung Galaxy Tab S7 FE मध्ये १२.४ इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन २,५६०x१,६०० पिक्सल आहे. या टॅबलेटमध्ये Snapdragon ७५०G प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात येईल. या व्यतिरिक्त टॅबच्या रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. टॅबलेटसोबत S Pen देखील मिळेल. याद्वारे यूजर्स आवश्यक नोट्स बनवू शकतील. या व्यतिरिक्त यात १०,९८० एमएएचची बॅटरी मिळेल, जी ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा टॅब अँड्राइड ११ वर काम करतो. वाचाः Samsung Galaxy Tab A7 Lite चे फीचर्स Samsung Galaxy Tab A7 Lite हा अँड्राइड ११ वर काम करतो. या टॅबलेटमध्ये ८.७ इंचाचा टीएफटी डिस्प्ले मिळेल. सोबतच, डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट दिला जाईल. टॅबमध्ये Helio P22T चिपसेट आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले जाईल. यात पॉवरसाठी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,१०० एमएएचची बॅटरी मिळेल. Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite ची संभाव्य किंमत सॅमसंगने आतापर्यंत Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite च्या किंमतीबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. रिपोर्टनुसार, या दोन्ही टॅबलेटची किंमत जवळपास ५५ हजार रुपये असू शकते. हे टॅब वेगवेगळ्या रंगात बाजारात उपलब्ध होतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U926n4
https://ift.tt/3voSMbH
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.