Type Here to Get Search Results !

Redmi Note 10 ने मोडले सर्व रेकॉर्ड, अवघ्या काही मिनिटात ५ लाखांहून जास्त फोनची विक्री

नवी दिल्लीः Xiaomi ने आपल्या मार्केटमध्ये म्हणजे चीनमध्ये आयोजित ६१८ सेलची आकडेवारी जारी केली आहे. चीनी टेक्नोलॉजी कंपनी या सेलमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव ब्रँड म्हणून उदयास आली आहे. अधिकृतपणे मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने ४९ मिनिट आणि ५२ सेकंदात १.५ बिलियन युआन (जवळपास १७ अब्ज रुपये) ची विक्री केली आहे. वाचाः शाओमीने खुलासा केला आहे की, रेडमी नोट १० सीरीज स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये कंपनीने ५ लाख हून जास्त युनिट्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे या सीरीजला काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने या सेलमध्ये आपले २० नवीन प्रोडक्ट्सवर सूट दिली होती. Xiaomi आणि रेडमी नोट १० प्रोला चीनमध्ये ५जी सपोर्ट सोबत चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. रेडमी नोट १० मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर दिले आहे. वाचाः रेडमी नोट १० प्रो मध्ये ६.६ इंचाचा एलसीडी पॅनेल दिले आहे. जो फुल एचडी प्लस स्क्री रिझॉल्यूशन दिले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ११०० चिपसटे दिला आहे. फोनमध्ये रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. प्रो मॉडल मद्ये ६४ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे दिले आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला रेडमी नोट १० प्रो मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर तर रेडमी नोट १० मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रेडमी नोट १० सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड ११ बेस्ड MIUI 12.5 कस्टम यूजर इंटरफेस सोबत येतो. हँडसेट्सला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ही फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RRNxnd
https://ift.tt/3g473oB
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.