नवी दिल्ली : कंपनी Realme आज जागतिक बाजारात तीन नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. लाँचिंग इव्हेंटमध्ये कंपनी स्मार्टफोन सह दोन नवीन कॅटेगरीमध्ये आणि ला लाँच करेल. आणि यूरोपचे हेड माधव सेठ यांनी माहिती दिली होती की Realme GT ला स्नॅपड्रॅग ८८८ प्रोसेसरसोबत लाँच केले जाईल. सोबतच Realme Book ला अॅल्यूमिनियन बॉडीसोबत सादर करणार असल्याचे म्हटले होते. हा Apple MacBooks सारखाच असू शकतो. या प्रोडक्ट्सची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, लाँचिंगनंतरच किंमतीचा खुलासा होईल. Realme GT 5G, Realme Book, Realme Pad बद्दल जाणून घेऊया. वाचाः Realme GT 5G, Realme Book, Realme Pad: लाइव्ह स्ट्रिमिंग कसे पाहाल ? Realme GT 5G, Realme Book, Realme Pad चा ग्लोबल लाँच इव्हेंट सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेस आणि युट्यूबवर पाहता येईल. Realme GT 5G चे फीचर्स: Realme GT 5G मध्ये ६.४३ इंचाचा फूल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. फोन स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसोबत येईल. सोबतच, यात १२ जीबीपर्यंत रॅम आमि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ४५०० एमएएचची बॅटरी मिळते, जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. वाचाः Realme Book आणि Realme Pad चे संभाव्य फीचर्स: Realme Book ला पातळ बेझल्ससोबत सादर केले जाईल. यात अॅल्यूमिनियन बॉडी मिळू शकते. सोबतच, दोन यूएसबी-सी पोर्ट दिले जाण्याची शक्यता आहे. यात दोन स्पीकर्स आणि एक कूलिंग कटआउट देखील मिळेल. लॅपटॉप विंडोज १० सोबत येईल. याव्यतिरिक्त Realme Pad नावाने कंपनीचा पहिला टॅबलेट देखील लाँच होईल. यात रियर कॅमेरा थोडा वरती आलेला असेल. याचे डिझाइन Apple Tab प्रमाणे असण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pT3k1o
https://ift.tt/2RVkgI6

