नवी दिल्लीः टेक कंपनी रियलमी युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत पॉप्यूलर मिड रेंज स्मार्टफोन ला ३ हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. ही ऑफर रियलमी ७ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी आहे. ही ऑफर २० जून पर्यंत आहे. वाचाः Realme 7 Pro चे फीचर्स फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि 180Hz चा टच सॅम्प्लिंग रेट दिला आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 720G SoC चिपसेट दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा २ मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, NavIC यूएसबी टाइप-C पोर्ट दिले आहेत. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gKRTpT
https://ift.tt/3gH7zdH

