Type Here to Get Search Results !

Poco चा सर्वात स्वस्त 5G फोनचा आज सेल, पाहा किंमत-ऑफर्स

नवी दिल्लीः ला भारतात आज दुसऱ्यांदा सेलमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनला भारतात नुकतेच लाँच करण्यात आले होते. हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 48MP प्रायमरी कॅमेरा सोबत येतो. आज दुपारी १२ वाजेपासून या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. वाचाः Poco M3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर Poco M3 Pro 5G स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मॉ़डलची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन कूल ब्लू , पॉवर ब्लॅक आणि पोको येलो मध्ये उपलब्ध आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी ५०० रुपयाची सूट देत आहे. बेस मॉडलला १३ हजार ४९९ रुपये आणि टॉप मॉडलला १५ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः फोनची फीचर्स Poco M3 Pro 5G स्मार्टफोन मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन ७०० प्रोसेसरचा इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात साउंड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकचे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये ड्युअल सिम (नॅनो) सपोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रओ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर साइडमाउंटेड दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cKXcmt
https://ift.tt/3vvzscy
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.