Type Here to Get Search Results !

Nikon ने भारतात लाँच केला रेट्रो लूक मिररलेस कॅमेरा, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : डीएसएलआर बनवणारी लोकप्रिय कंपनी ने भारतात रेट्रो लूक आणि पॉवरफुल फीचर्स असणारा जबरदस्त मिररलेस कॅमेरा लाँच केला आहे. टचस्क्रीन एलसीडी डिस्प्लेसह येणारा हा कॅमेरा दिसायला खूपच आकर्षक आहे. या कॅमेऱ्याला पाहिल्यावर १९८० च्या दशकातील लोकप्रिय कॅमेऱ्यासोबतच , , Pentax, Leica, Olympus सारख्या कंपन्यांच्या कॅमेऱ्याची आठवण येईल. भारतासह जगभरात कॉम्पॅक्ट साइज मिररलेस कॅमेऱ्यांची मागणी वाढल्याने निकॉनने देखील ग्राहकांसाठी रेट्रो लूक असणारा कॅमेरा आणला आहे. वाचाः Nikon Z FC ची किंमत Nikon Z FC ला भारतात केवळ ८४,९९५ रुपयात (केवळ बॉडी) लाँच करण्यात आले आहे. कॅमेऱ्याला Nikkor Z 28mm f/2.8 (SE) लेंससोबत खरेदी केल्यास १,०५,९९५ रुपये द्यावे लागतील. तसेच, Nikkor Z DX-16 50mm f/3.5-6.3 VR लेंससोबत खरेदी केल्यास ९७,९९५ रुपये द्यावे लागतील. कॅमेऱ्याला तुम्ही जुलैच्या अखेरीस अधिकॉत स्टोरवरून खरेदी करू शकता. कॅमेरा निकॉनच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध झाला आहे. मॅट सिल्वर बॉडी आणि टेक्सचर लेदर मटेरियलसह येणाऱ्या या कॅमेऱ्यात लेदर मटेरियल ६ आकर्षक रंगात येतात. वाचाः Nikon Z FC ची वैशिष्ट्ये Nikon Z FC Mirrorless Camera च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये २०.९ मेगापिक्सलचा APS-C (DX) क्रॉप्ड सेंसर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याची ISO रेंज १००-५१,२०० पर्यंत आहे. TFT LCD टचस्क्रीन डिस्प्लेसह येणाऱ्या या कॅमेऱ्यात शटर स्पीड, एक्सपोजर कंपोझिशन आणि आयएसओ सेंसिटिव्हिटीसाठी ३ डायल्स देण्यात आले आहेत. यात एक लहान विंडो देखील देण्यात आली असून, यामुळे अपर्चरची माहिती मिळते. अ‍ॅप सपोर्ट या कॅमेऱ्याद्वारे स्लो मोशन व्हिडीओ शूट करण्यासोबतच ४के UHD व्हिडीओ शूट करू शकता. हा निकॉनचा पहिला असा कॅमेरा आहे, ज्याद्वारे ऑटो मोडमध्ये देखील एक्सपोजर कंपोझिशन फीचरचा वापर करू शकता व ब्राइटनेससह अन्य सेटिंग्स कंट्रोल करता येईल. हैं। SnapBridge v२.८ अ‍ॅपद्वारे तुम्ही सहज कॅमेऱ्यातून अँड्राइड अथवा आयओएस स्मार्टफोनमध्ये फोटो-व्हिडीओ पाठवू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A9EdfA
https://ift.tt/2UIKTB0
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.