नवी दिल्ली : ग्लोबल ब्रँड चा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. याची सुरुवाती किंमत ८,९९९ रुपये आहे. फोनची विक्री १५ जूनला १२ वाजता सुरू होईल. ई-कॉमर्स साइट वरून फोन खरेदी करता येईल. लाँचिंग ऑफर अंतर्गत १००० रुपये सूटसह ७,९९९ रुपयात खरेदी करता येईल. मात्र, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, १५ जूनलाच लागू होईल. हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे, जो कमी कमी किंमतीसह ६००० एमएएच बॅटरी आणि ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत येतो. फोनला Magnet Black, Jewel Blue आणि Nebula Orange रंगात खरेदी करता येईल. वाचाः स्पेसिफिकेशन्स TECNO SPARK 7T स्मार्टफोनमध्ये एक मोठा ६.५२ इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०:३४ टक्के आहे. तर पिक्सल डेंसिटी २६९ पीपीआय आणि पीक ब्राइटनेस ४८० nits आहे. TECNO SPARK 7T स्मार्टफोन Mediatek Helio G३५ प्रोसेसर सपोर्टसह येतो. यात HyperEngine टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित HiOS ७.६ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. फोटोग्राफीसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सल AI सेल्फी कॅमेरा मिळेल, जो मायक्रो स्लिट ड्यूल फ्लॅश सपोर्टसोबत येईल. यात रियरला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये स्माइल शॉटसोबत ऑटो कॅप्चर फोटो, पोर्ट्रेट मोड, AI HDR मोड, वाइड सेल्फी, ब्यूटी मोड सपोर्ट मिळेल. वाचाः बॅटरी TECNO SPARK 7T मध्ये इन-बिल्ट फेस अनलॉक २.० आणि स्मार्ट फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट मिळेल. पॉवर बॅकअपसाठी यात ६००० एमएएचची लिथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये ३६ दिवसांचा स्टँडबाय बॅटरी बॅकअप मिळेल. फोनमध्ये १५X to ५४००X स्पीड सोबत टाइम लॅप्स मोडचा सपोर्ट मिळेल. यात २के व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि १२० fps वर स्लो मोशन सपोर्ट देण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pK3ND9
https://ift.tt/3iARVSm

