Type Here to Get Search Results !

स्वस्तात खरेदी करा आयफोन, iPhone 12 mini वर आकर्षक ऑफर

नवी दिल्लीः जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर खरेदी करण्याची एक चांगली संधी आहे. अॅमेझॉन इंडियावर फोनवर आकर्षक ऑफर दिली जात आहे. मिनी डिस्प्लेच्या आयफोनला एक्सचेंज ऑफर, ८ हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करू शकता. सध्या आयफोन १२ सीरीज मध्ये हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः iPhone 12 Mini: ऑफर्स आयफोन १२ मिनीला अॅमेझॉन वर ६९ हजार ९०० रुपयात विक्री केली जात होती. परंतु, डिस्काउंट नंतर हँडसेटला ६१ हजार ९०० रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. ही किंमत ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय सोबत ११ हजार ०६७ रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय वर १२ महिन्यासाठी खरेदी करता येऊ शकते. हँडसेटवर ११ हजार १०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याशिवाय, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वरून फोन खरेदी केल्यास ७५० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. HSBC कॅशबॅक कार्ड ट्रांजॅक्शनद्वारे फोन घेतल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळतो. वाचाः iPhone 12 Mini: चे फीचर्स iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंचाचा स्क्रीन दिला आहे. कॉम्पॅक्ट बॉडीसोबत हा आयफोन हातात पकडण्यासाठी खूप चांगला आहे. परंतु, फोनवर तुम्ही कॉन्टेंट स्ट्रीम करायची असेल तर तुमची थोडी निराशा होऊ शकते. या फोनमध्ये ए १४ बायोनिक चिपसेट दिला आहे. आयफोनमध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड सेन्सर सोबत ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. हँडसेट मध्ये नाइट मोड सोबत १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा सिस्टम दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pGPVcG
https://ift.tt/3wrSd2d
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.