Type Here to Get Search Results !

End-to-end encrypted असतानाही कसे लीक होते WhatsApp चॅट ? हे आहे कारण

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे. जगभरात दररोज कोट्यावधी मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवले जातात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की या सर्व मेसेजला सुरक्षित कसे ठेवते. कंपनीचे म्हणणे आहे की ते कोणतेही मेसेज वाचत नाही. कारण, प्रत्येक मेसेज Encrypted असतात. संवाद हा असतो. मात्र, जर असे असेल तर कसे होतात ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. वाचाः वर बॅकअप WhatsApp चॅट्सचे बॅकअप गुगल ड्राइव्हवर जात असते. तुम्ही यासाठी स्वतः Email ID ने लिंक करता. तुम्ही WhatsApp च्या चॅट बॅकअप सेटिंग्समध्ये जाऊन हे पाहू शकता. अनेकजण चॅटला ऑटो बॅकअप ठेवतात. जेणेकरून, चॅट्सचे बॅकअप गुगल ड्राइव्हमध्ये सेव्ह होईल. यामुळे जुने चॅट्स शोधणे आणि फोन बदलताना चॅट्स रिस्टोर करण्यास मदत होते. मात्र, चॅट्स आणि फोटो लीक होण्याचे हेच कारण आहे. Google Drive वर End-to-end encrypted WhatsApp चॅट्स हे End-to-end encrypted आहेत. परंतु, गुगल ड्राइव्हवर जो चॅट बॅकअप घेण्यात आला आहे तो End-to-end encrypted नाही. चॅट्समधील सर्व फोटो आणि व्हिडीओज गुगल ड्राइव्हवर स्टोर होतात. त्यामुळे युजरच्या Gmail Account ला अ‍ॅक्सेस केल्यास सर्व चॅट हिस्ट्री आणि बॅकअप मिळू शकतो. अनेक प्रकरणात चॅट बॅकअपमुळेच खासगी फोटो लीक झाल्याचे समोर आले आहे. वाचाः कसे काम करते End-to-end encrypted समजा, व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही कोणाला 'हॅलो' असा मेसेज केला आहे. तुम्ही 'हॅलो' पाठवताच हा शब्द एखाद्या कोडमध्ये बदलतो. म्हणजेच हा कोड 'एन्क्रिप्ट' होतो. ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवला आहे, त्याच्याकडे मेसेज 'डिक्रिप्ट' होतो. म्हणजे, कोड पुन्हा हॅलोमध्ये बदलतो. पाठणाऱ्या व्यक्तीपासून ते मेसेज मिळणाऱ्या व्यक्तीपर्यंत हे शब्द कोड स्वरूपात असतात. मेसेज पोहचेपर्यंत कोणी हॅक जरी केले तरीही संदेश डिकोड करता येणार नाही. या प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपचे 'एंड टू एंड एन्क्रिप्शन' यूजर्सचे खासगी मेसेज आणि गोपनीयतेची सुरक्षा करते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vaiH6T
https://ift.tt/3gmXfGi
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.