Type Here to Get Search Results !

ओप्पोच्या या स्मार्टफोनला भारतात तुफान प्रतिसाद, ३ दिवसांत २३० कोटी रुपयांच्या फोनची विक्री

नवी दिल्लीः तुम्हाला जर बजेट रेंज मध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही फायदेशीर न्यूज आहे. सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या फोनविषयी आम्ही तुम्हाला खास माहिती सांगणार आहोत. ओप्पोकडून करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. ओप्पोकडून नुकताच लाँच करण्यात आलेल्या 5G फोन OPPO F19 Pro+ 5G फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. वाचाः ३ दिवसांत विकले होते २३० कोटी रुपयांहून जास्त फोन OPPO F19 Pro+ 5G ला नुकतेच मार्च आणि एप्रिल मध्ये लागोपाठ दोन महिन्यासाठी २५ ते ३० हजार रुपयाच्या कॅटेगरीच्या स्मार्टफोनच्या रेंज मध्ये F19 Pro+ 5G सर्वात जास्त विकला जाणारा फोन असल्याचे सांगितले आहे. या फोनची सर्वात जास्त विक्री अहमदाबाद, बेंगळुरू आणि मुंबईत झाली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या फोनची किंमत कमी ठेवल्याने लोकांना जास्त पसंत पडत आहे. बाजारात F19 प्रो सीरीजच्या उपलब्धतेनंतर केवळ तीन दिवसात या फोनची २३० कोटीहून जास्त रुपयांचे फोन विकले गेले होते. वाचाः OPPO F19 Pro Plus 5G चे फीचर्स OPPO F19 Pro Plus 5G मध्ये ६.४३ इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले दिला आहे. यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. ज्यात 48MP चे मेन लेंस, 8MP Wide Angle Macro लेंस, 2MP Portrait Mono लेंस, 2MP Macro Mono लेंस मिळतो. फ्रंट मध्ये कंपनी ने 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. OPPO F19 Pro Plus 5G ला पॉवर देण्यासाठी 4310mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः OPPO F19 Pro Plus 5G ची किंमत OPPO F19 Pro Plus 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन फ्लूइड ब्लॅक आणि स्पेस सिल्वर कलर मध्ये येतो. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xgW4yK
https://ift.tt/2Sq7K3C
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.