नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळे प्लान्स ऑफर करत आहे. यात काही प्लान्स खूपच स्वस्त आहेत, तर काही प्लान्सची किंमत अधिक आहे. अनेकदा ग्राहक जास्त किंमतीमुळे महागडे करत नाही. अशा यूजर्ससाठी देखील कंपनी कमी किंमतीत दमदार प्लान्स उपलब्ध करत आहे. एअरटेलचे काही प्लान्स १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. या प्लान्सची किंमत १९ रुपयांपासून सुरू होते व यात कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स मिळतात. या प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचाः एअरटेलचा १० रुपयांचा प्लान: हा एक टॉकटाइम प्लान असून, यात कोणत्याही वैधतेशिवाय ७.४७ रुपये टॉकटाइम मिळेल. एअरटेलचा १९ रुपयांचा प्लान: या प्लानची वैधता २ दिवस असून, यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि २०० एमबी डेटा मिळेल. एअरटेलचा २० रुपयांचा प्लान: हा एक टॉकटाइम प्लान असून, यात कोणत्याही वैधतेशिवाय १४.९५ रुपये टॉकटाइम मिळेल. एअरटेलचा ४८ रुपयांचा प्लान: हा डेटा प्लान असून, यात यूजर्सला त्यांच्या सध्याच्या प्लान एवढीच वैधता दिली जाते. यात ३ जीबी डेटा मिळेल. एअरटेलचा ४९ रुपयांचा प्लान: या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात ३८.५२ रुपये टॉकटाइम आणि १०० एमबी डेटा मिळेल. एअरटेलचा ७८ रुपयांचा प्लान: हा डेटा प्लान असून, यात यूजर्सला त्यांच्या सध्याच्या प्लान एवढीच वैधता दिली जाते. यात ५ जीबी डेटा मिळेल. सोबतच, सबस्क्रिप्शन मिळेल. एअरटेलचा ७९ रुपयांचा प्लान: या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात ग्राहकांना १२८ रुपये टॉकटाइम आणि २०० एमबी डेटा मिळेल. एअरटेलचा ८९ रुपयांचा प्लान: हा डेटा प्लान असून, यात यूजर्सला त्यांच्या सध्याच्या प्लान एवढीच वैधता दिली जाते. यात ६ जीबी डेटा मिळेल. सोबतच, Mobile Edition आणि Free Hellotunes सबस्क्रिप्शन मिळेल. एअरटेलचा ९८ रुपयांचा प्लान: हा डेटा प्लान असून, यात यूजर्सला त्यांच्या सध्याच्या प्लान एवढीच वैधता दिली जाते. यात १२ जीबी डेटा मिळेल. एअरटेलचा १०० रुपयांचा प्लान: हा एक टॉकटाइम प्लान असून, यात कोणत्याही वैधतेशिवाय ८१.७५ रुपये टॉकटाइम मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gISdFB
https://ift.tt/3zRvcYD

