Type Here to Get Search Results !

Xiaomi Mi 11 सीरीजला जबरदस्त प्रतिसाद, ३० लाखांहून जास्त फोनची विक्री

नवी दिल्ली : सीरिजला यूजर्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या या फोनची जगभरात जबरदस्त विक्री झाली आहे. कंपनीनुसार, जगभरात Xiaomi सीरिजच्या तब्बल ३० लाखांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री झाली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने Mi 11, Mi 11 Pro आणि हे तीन लाँच केले होते. वाचा : याशिवाय एम११ सीरिजचे फोन चीनमध्ये बेस्ट सेलिंग अँड्राइड स्मार्टफोन्स ठरल्याचे देखील कंपनीने सांगितले. एमआय ११ सीरिजच्या स्मार्टफोनची किंमत ४ हजार युआन ते ६ हजार युआन (जवळपास ४५,३०० रुपये ते ६८,००० रुपये) आहे. एमआय ११ सीरिजचे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स या सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये १४४०x३२०० पिक्सल रिझॉल्यूशनसोबत ६.८१ इंच QHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेची खास गोष्ट म्हणजे यात १२०Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपॉर्ट देण्यात आला आहे. तिन्ही स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पातळ बेजल्ससोबत येतो. डिव्हाइसमद्ये बायोमेट्रिक सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Mi 11 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. यात स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट प्रोसेसर मिळेल. सीरिजच्या फोनमध्ये शानदार कॅमेरा सेटअप मिळतो. एमआय ११ च्या रियरला एअलडी फ्लॅशसोबत १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासोबत १३ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि एक ५ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. वाचा : Mi 11 प्रो मध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी लेंस, १३ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि ८ मेगापिक्सल टेलिफोटो सेंसर देण्यात आला आहे. या सीरिजच्या टॉप-एंड व्हेरिएंट Mi 11 अल्ट्रा मध्ये ५० मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यासोबत ४८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि ४८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी तिन्ही डिव्हाइसमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सीरिजच्या बेस व्हेरिएंटमध्ये ५५ वॉटची वायर्ड आणि ५० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगसोबत ४६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. प्रो आणि अल्ट्रा व्हेरिएंटमध्ये कंपनीने ६७ वॉट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3496rbr
https://ift.tt/3vd7cwe
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.