Type Here to Get Search Results !

१४८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा Vivo X60 Pro 5G स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः मार्च महिन्याच्या अखेरला विवो कंपनीने मलेशियात स्मार्टफोनला लाँच केले होते. आता दोन महिन्यांनंतर कंपनीने या फोनला यूरोपमध्ये लाँच केले आहे. विवोच्या माहितीनुसार, नवीन Vivo X60 Pro 5G स्मार्टफोन UEFA Euro 2020 चॅम्पियनशीपचा अधिकृत स्मार्टफोन आहे. वाचाः Vivo X60 Pro 5G चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात देण्यात आलेला कॅमेरा सेटअप आहे. यात फोनमध्ये कंपनीने ZEISS सोबत मिळून एक नवीन गंबल स्टेबिलायझेशन सिस्टम दिले आहे. विवोच्या म्हणण्यानुसार, यात ५ अॅक्सिस व्हिडिओ स्टेबिलायझेशन सिस्टम दिले आहे. याशिवाय, फोनमध्ये एक नवीन पिक्सल शिफ्ट अल्ट्रा एचडी इमेजिंग टेक्नोलॉजी दिली आहे. यात कलर्स, डिटेलिंग आणि झूप शार्पनेसला वाढवते. विवोच्या म्हणण्यानुसार, फोनसाठी आयकॉनिक ZEISS Biotar Portrait Style ला रीक्रिएट केले आहे. वाचाः Vivo X60 Pro 5G मध्ये रियरवर १४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल, आणि १३ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स दिले आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. विवोच्या या फोनमद्ये ६.५६ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. विवोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4200mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. विवोच्या या फोनला ७४९ यूरो मध्ये लाँच करण्यात आले आहे. ३ जूनपासून फोन खरेदी साठी उपलब्ध होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QGxOGW
https://ift.tt/3yrLdDz
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.