नवी दिल्लीः विवोने गेल्या महिन्यात देशात लाँच केलेल्या स्मार्टफोनची विक्री अखेर सुरू करण्यात आली आहे. विवोच्या या स्मार्टफोनला ५ जी सपोर्ट दिला आहे. विवोच्या या लेटेस्ट फोनमध्ये 90 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट एमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी दिला आहे. वाचाः Vivo V21 5G ची भारतातील किंमत आणि ऑफर्स विवोच्या या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३२ हजार ९९० रुपये आहे. फोनला डस्क ब्लू, सनसेट डेजल आणि आर्कटिक व्हाइट कलर मध्ये उपलब्ध केले आहे. या फोनला फ्लिपकार्ट, विवो ई-स्टार आणि ऑफलाइन स्टोर्सवरून विक्री सुरू करण्यात आली आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड युजर्संना फ्लिपकार्टद्वारे खरेदी केल्यास २ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. वाचाः Vivo V21 5G: स्पेसिफिकेशन्स विवोच्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज दिला आहे. डिस्प्ले वर नॉच दिले आहे. फोनमध्ये डायमेंसिटी 800U चिपसेट दिले आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजचा ऑप्शन दिला आहे. फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन आणि आय ऑटो फोकस सोबत येतो. फोनमध्ये रियरवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. फोनमध्ये चार्जिंग साठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eWmUVp
https://ift.tt/3b7QwxZ

