Type Here to Get Search Results !

Samsung Galaxy F41 स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, फोनवर ४ हजार २०० रुपयांची सूट

नवी दिल्लीः ग्राहकांना सॅमसंगचा 6000mAh बॅटरीचा फोन एकदम स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट (Flipkart) वर १७ मे पासून म्हणजेच आजपासून इलेक्ट्रॉनिक्स सेल (Electronics Sale) ला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या या फोनवर डिस्काउंट मिळत आहे. तसेच या फोनवर HDFC कार्ड्स वर वेगळा इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. दोन्ही डिस्काउंट मिळून हा फोन ग्राहकांना फक्त १२ हजार २४९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ ची ऑफर हा स्मार्टफोन दोन व्हेरियंट मध्ये येतो. लाँचिंग वेळी 6GB + 64GB मॉडलची किंमत १६ हजार ४९९ रुपये आणि 6GB + 128GB मॉडलची किंमत १७ हजार ९९९ रुपये होती. फ्लिपकार्टवर सध्या या दोन्ही व्हेरियंटला ३५०० रुपयांच्या सूट सोबत म्हणजेच १२ हजार ९९९ रुपये आणि १४ हजार ४९९ रुपयांत विकले जात आहे. याशिवाय, HDFC क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ६४ जीबी मॉडल १२ हजार २४९ रुपये आणि १२८ जीबी मॉडल १३ हजार ७४९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. याप्रमाणे या फोनवर ४२५० रुपयांची बचत करता येऊ शकते. वाचाः 6000mAh ची मोठी बॅटरी सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस sAMOLED इन्फिनिटी U डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेरासाठी नॉच दिला आहे. फोनला ६ जीबी रॅम, १२८ जीबी पर्यंत स्टोरेज सोबत खरेदी करू शकता. तसेच Exynos 9611 प्रोसेसरसोबत हा फोन येतो. यात 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. १५ वॉटचे चार्जर सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्ज मध्ये बॅटरी २१ तास पर्यंत ब्राउजिंग टाइम तसेच ४८ तासांपर्यंत व्हाइस कॉलिंग देते. वाचाः 64MPचा रियर कॅमेरा स्मार्टफोनच्या मागे तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि लाइव्ह फोकस सपोर्टचा ५ मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर आहे. रियर कॅमेरा 4K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट शूटर मिळतो. हा स्मार्टफोन तीन रंगात फ्यूजन ब्लॅक, फ्यूजन ब्लू आणि फ्यूजन ग्रीन मध्ये उपलब्ध आहे. वाचा : वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QotZG5
https://ift.tt/3hzscsW
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.