Type Here to Get Search Results !

Jio चा २५० रुपयांहून स्वस्त रिचार्ज प्लान, रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वैधतेचे खूप सारे प्लान ऑफर करीत आहे. यात ग्राहकांना जास्त डेटाचा वापर करता येऊ शकतो. यासाठी जिओ मध्ये रोज २ जीबी डेटाचे अनेक प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओचा रोज २ जीबी डेटाचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत. हा प्लान तुम्हाला २५० रुपयांहून कमी किंमतीत मिळतो. प्लानमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. वाचाः Jio चा २४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानच किंमत २४९ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. रोज २ जीबी डेटा दिला जातो. युजर्संना यात एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा ४४४ रुपयांचा प्लान जर तुम्हाला प्लानमध्ये दुप्पट वैधता हवी असेल तर जिओचा हा ४४४ रुपयांचा प्लान बेस्ट आहे. जिओच्या ४४४ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधते सोबत रोज २ जीबी डेटा एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा ५९९ रुपयांचा प्लान कंपनी ८४ दिवसांसाठी २ जीबी डेटाचा प्लान ऑफर करते. याची किंमत ५९९ रुपये आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा दिला जातो. यात एकूम १६८ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये रोज अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएम दिले जातात. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RnvGnK
https://ift.tt/3tZbIgw
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.