Type Here to Get Search Results !

फक्त १ रुपया जास्त द्या अन् २४ जीबी डेटा जास्त मिळवा, कॉलिंगही फ्री, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः दिग्गज टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) आपल्या युजर्संसाठी खूप सारे प्रीपेड प्लान ऑफर करीत आहेत. ग्राहाकांना आपल्या पसंतीनुसार, बेस्ट प्लानची निवड करता यावी यासाठी कंपनी वारंवार प्लान ऑफर करते. खूप सारे प्लान असल्याने कोणत्या प्लानची निवड करावी हे अनेकदा आपल्याला कळत नाही. अनेक प्लान तर असे आहेत त्यात फक्त १ रुपयांचा फरक आहे. परंतु, सुविधा वेगवेगळ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Vi च्या अशाच एका प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्यात १ रुपया जास्त देऊन २४ जीबी डेटा जास्त मिळतो. जाणून घ्या सविस्तर. वाचाः कसा मिळेल एक्स्ट्रा डेटा वोडाफोन आयडिया ग्राहकांसाठी २१८ रुपये आणि २१९ रुपयाचे दोन प्लान ऑफर केले जाते. दोन्ही प्लान जवळपास सारखेच आहेत. प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि फ्री कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये फक्त डेटाचा फरक आहे. २१८ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त ६ जीबी डेटा मिळतो. तर २१९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच १ रुपया अतिरिक्त देऊन तुम्ही २४ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळवू शकता. वाचाः Vi चा २१८ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा २१८ रुपयांच्या प्लानमध्ये मर्यादीत डेटा दिला जातो. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळत असून यात एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. ज्यात कोणत्याही प्रकारची लिमिट नाही. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, ग्राहकांना Vi Movies & TV Basic चे अॅक्सेस दिले जाते. वाचा : Vi चा २१९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा २१९ रुपयांचा प्लान सुद्धा २१८ रुपयाप्रमाणे आहे. यात २८ दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना रोज १ जीबी डेटा आणि २ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. याप्रमाणे यात एकूण ३० जीबी डेटा होतो. प्लानमध्ये सर्व अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, ग्राहकांना Vi Movies & TV Basic चे अॅक्सेस मिळते. चा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bAY4tn
https://ift.tt/3otJGbQ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.