Type Here to Get Search Results !

सर्वात स्वस्त प्लान, ९७ रुपयात रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी अजूनही खासगी कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांना जोरदार टक्कर देत आहे. याच्या मागे सर्वात मोठे कारण म्हणजे, बीएसएनएलचे स्वस्त प्रीपेड प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लानसंबंधी माहिती देत आहोत. हा प्लान फक्त बीएसएनएलकडे आहे. या प्लानची किंमत ९७ रुपये आहे. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे हा प्लान जवळपास सर्वच सर्कल मध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या प्लानची सविस्तर माहिती. वाचाः बीएसएनएलचा ९७ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएलच्या या स्वस्त प्रीपेड प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात भरपूर डेटा दिला जातो. प्लानमध्ये १८ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच रोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच एकूण ३६ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी, रोमिंग कॉलिंग दिली जाते. सोबत रोज १०० एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये ग्राहकांना आणखी काही सुविधा दिली जाते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान जिओ किंवा दुसरी अन्य कंपनीकडे ९७ रुपयांचा कोणताही प्लान नाही. जिओकडे या सुविधेचा सर्वात स्वस्त प्लान हा १४९ रुपयांचा आहे. यात ग्राहकांना २४ दिवसांची वैधता दिली जाते. तसेच रोज १ जीबी डेटा दिला जातो. यात एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा १४९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडिया आणि एअरटेलचा प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा आणि एअरटेलच्या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. यात फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जातात. वोडाफोनच्या या प्लानमध्ये Vi Movies & TV Basic चे फ्री अॅक्सेस दिले जाते. एअरटेलच्या या प्लानमध्ये १ महिन्याचे Prime Video चे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Free Hellotunes, Wynk Music, आणि Airtel Xstream चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3unt7R2
https://ift.tt/2SrA31h
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.