Type Here to Get Search Results !

ओप्पोचा नवा फोन मार्केटमध्ये लाँच, १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज, पाहा किंमत

नवी दिल्लीः ओप्पो कंपनीने लाँच केला आहे. या फोनला कंपनीने सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये एक रियर पॅनेलवर एक नवीन स्काय रॉक ग्रे पेंट दिले आहे. हे कस्टम ओएस थीम सोबत येते. हे फाइंड एक्स ३ प्रोचे पाचवे कलर ऑप्शन आहे. याआधी फोनला कॉस्मिक मोका, ग्लास ब्लॅक, ब्लू आणि व्हाइस कलर मध्ये आणले होते. नवीन मार्स एक्सप्लोरेशन एडिशनमध्ये १६ जीबी रॅम व स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट सारखे खास फीचर्स दिले आहेत. वाचाः OPPO Find X3 Pro Mars Exploration Editionची किंमत ओप्पोच्या या फोनची चिनी मार्केटमध्ये ६९९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ७९ हजार ६७५ रुपये ठेवली आहे. फोनला एक कस्टम गिफ्ट बॉक्स सोबत शिप केले जात आहे. वाचाः OPPO Find X3 Pro Mars Exploration Edition फोनचे फीचर्स नवीन हँडसेटमध्ये सर्व ओरिजिनल स्मार्टफोनचे आहेत. फोनमध्ये ६.५ इंचाचा LTPO एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 3216 x 1440 पिक्सल आहे. डिस्प्ले पॅनेलवर रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट दिला आहे. डिव्हाइस मध्ये १६ जीबी रॅम दिला आहे. इनबिल्ट स्टोरेज ५१२ जीबी दिला आहे. फोन अँड्रॉयड ११ सोबत येतो. या हँडसेट मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. याशिवाय, फेस अनलॉक फीचर दिले आहे. वाचाः या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ५० मेगापिक्सलचा प्रायमरी मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ३ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. डिव्हाइस मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAhची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट SuperVOOC 2.0 फ्लॅश चार्जिंग आणि 30W AirVOOC वायरलेस फ्लॅश चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः वाचाः वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3huIXFG
https://ift.tt/3onrws6
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.