Type Here to Get Search Results !

१४९ रुपयांत महिनाभर चालणारा रिचार्ज, फ्री कॉलिंग आणि २४ जीबी डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान ऑफर करीत आहे. ग्राहकांना कमी किंमतीत चांगले प्रीपेड प्लान हवे असेल तर या तीन कंपन्यांकडे १४९ रुपयाचे रिचार्ज प्लान आहेत. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात महिनाभर वैधता मिळते. सोबत फ्री कॉलिंग आणि डेटाची सुविधा देण्यात येते. हा प्लान त्या लोकांसाठी खास आहे. ज्यांना जास्त डेटाची गरज नाही. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन चे १४९ रुपयांचे रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सर्वात जास्त डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता मिळते. यासोबतच रोज १ जीबी डेटा दिला जातो. याप्रमाणे एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिं आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वोडाफोन आयडियाचे १४९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाच्या या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात २८ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा दिला जातो. याचा वापर कधीही केला जाऊ शकतो. यात सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, Vi Movies & TV Basic चे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः एअरटेलचा १४९ रुपयांचा प्लान एअरटेलचा हा प्लान सर्वात कमी डेटा मिळतो. हा डेटा केवळ २ जीबी पर्यंत मिळतो. यात ग्राहकांना २८ दिवसांची वैधता दिली आहे. प्लानमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, १ महिन्यासाठी Prime Video चे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Free Hellotunes, Wynk Music, आणि Xstream चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f487bB
https://ift.tt/2RfjapY
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.