Type Here to Get Search Results !

भारतात 5G टेस्टिंगवर बंदीची मागणी, 'हा' धोका असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्लीः भारतात टॉवर टेस्टिंगवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेला वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टात दाखल केले आहे. भारताहस जगभरात 5G नेटवर्कचा विरोध केला जात आहे. 5G नेटवर्क हे धोकादायक असल्याचा दावा या याचिकेतून केला आहे. वाचाः सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले की, 5G इंटरनेट गोपिनियतेसाठी मोठे संकट आहे. युजर्संचा डेटा कुणीही सहज हॅक करू शकतो. यासोबत नेदरलँडमध्ये चाचणी दरम्यान, शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हेग शहरात 5G नेटवर्क चाचणी दरम्यान जवळपास ३०० पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. याचिकेत म्हटले की, २०१८ मध्ये चिनी कंपनी हुवावेने गुरूग्राम, हरियाणा त ५जी इंटरनेटची चाचणी केली होती. यात म्हटले की, 5G नेटवर्कच्या टेक्नोलॉजीत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा उपयोग केला जातो. यात कॅन्सरचा धोका मोठा वाढतो. तसेच गर्भावस्थे दरम्यान मोबाइल रेडिएशनने महिलासोबत छोट्या मुलांवर सुद्धा याचा परिणाम होतो. याचिकेत म्हटले की, 5G नेटवर्क हे दहशतवाद्यांना मदत होईल. देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. वाचाः टेलिकॉम कंपन्या सध्या 5G टेस्टिंग वर जोर देत आहे. एअरटेल, रिलायन्स जिओ, आणि वोडाफोन - आयडिया लागोपाठ टेस्टिंगवर काम करीत आहे. जिओने नुकतेच ५७१२३ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. यावरून कंपनीने २२ सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. रिलायन्स जिओने खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचा वापर 5G सर्विस देण्यासाठी केला जाणार आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली की, स्वदेशी 5G टेक्नोलॉजी डेव्हलप करीत आहे. याला अमेरिकेत टेस्ट केले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xVrTyy
https://ift.tt/3tfBRHl
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.